आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचा इशारा:केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवेंसमोर शेतकऱ्याने फोडला टाहो; राज्य सरकारने 8 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल- दानवे

परभणी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे परभणी जिल्ह्यात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दैठणा, सुनेगाव (सायाळा), गंगाखेड, पालम, ताडकळस, पिंगळी, मुरुंबा याभागात भेटी देत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

दरम्यान सुनेगाव सायाळा येथील शेतकरी माऊली सूर्यवंशी यांनी मंत्री दानवे यांचे शेतात आगमन होताच टाहो फोडत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि माझ्यासह समस्त शेतकर्‍यांना न्याय द्या, असे म्हणत त्यांनी चक्क दानवे यांच्या समोर स्वतःला झोकून दिले. या प्रकाराने मंत्री दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी चक्रावून गेले होते. त्यानंतर उपस्थितांनी त्या शेतकऱ्याला धीर देत सांत्वन केले.

त्यानंतर परभणी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून राज्यातील सरकार यांच्याकडे लक्ष देत नाही. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...