आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Part 2 Of The 11th Admission Application Can Be Filled From 12th August; Schedule Announced By The Department Of Education

प्रवेश प्रक्रिया:अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग दोन 12 ऑगस्ट पासून भरता येणार;शिक्षण विभागातर्फे वेळापत्रक जाहिर

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असून, सोमवारी शिक्षण विभागाच्या वतीने अर्जाचा भाग दोन कधी भरता येईल. याचे वेळापत्रक जाहिर केले असून, विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेला भाग दोन आता १२ ऑगस्ट पासून भरता येणार आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी जाहिर करण्यात आला. यंदा कोराना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने भूगोल विषयाचा पेपर रद्द करत त्या विषयाला सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लॉकडाऊन आणि प्रादुर्भाव वाढत गेल्याने निकाल उशीरा लागल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया देखील उशीरा सुरु करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील विविध ११५ निकाला पूर्वीच शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून अकरावी प्रवेशा अर्जाचा भाग एक नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे २९ जुलै रोजी निकालापूर्वीच यंदाची नोंदणी सुरु झाली होती. शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध ३१ हजार १४५ जागांवर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी सोमवार पर्यंत सुमारे १९ हजार ६२ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी १० हजार ९४५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून ९ हजार ७४१ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करून घेतली आहे. आता भाग दोनचे वेळापत्रक जाहिर झाल्याने प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे. भाग दोन बरोबरच ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक भरलेला नाही. अशांना एक आणि दोन भाग भरता येईल.

असे आहे वेळापत्रक -

१२ ऑगस्ट पासून अर्जाचा भाग दोन भरता येईल

२२ ऑगस्ट पर्यंत पहिल्या फेरीसाठी अर्ज करता येईल.

२३ ऑगस्टला तात्पूर्ती गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येतील.

३० पहिल्या फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहिर होईल.

३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत पहिल्या यादीत नाव असलेल्यांनी प्रवेश निश्चित करायचे असून, पहिला पसंतीक्रम मिळालेल्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे व त्यांनी आपला प्रवेश (केंद्रिय प्रवेश प्रक्रियेतून कोटा प्रवेशाद्वारे)निश्चित केलेला आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पुढील फेऱ्यांसाठी बाजूला केले जातील. पुढील फेऱ्यांचे वेळापत्रक लवकरच जाहिर करण्यात येईल. असे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...