आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थ पवार- सुजय विखेंची अचानक भेट:विखे आणि पवारांची 'सीमांपलीकडील मैत्री', विमानतळावरील फोटो केला शेअर; राजकीय तर्क- वितर्कांना उधाण

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पक्षाच्या काही कार्यक्रमासाठी औरंगाबादला आले होते.

राजकारणात कितीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, टीकाटिप्पण्या केल्या तरीही राजकारणापलीकडे नेत्यांचे एकमेकांशी संबंध अती गोड असतात. नेत्यांच्या राजकारणापलिकडच्या मैत्रीचे अनेक किस्से जनतेने पाहिले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक नेतेमंडळी आपले नाते, मैत्री संबंध कायम टिकून ठेवतात. अशाच एका मैत्रीचे उदाहरण आज सर्वांना पाहायला मिळाले आहे. ते म्हणजे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार.

लोकसभा निवडणुकी दरम्यान रिंगणात उतरलेल्या राजकारणातील दोन नातूंची मोठी चर्चा झाली होती. यातील एक खासदार झाला तर एकाला पराभवाला सामोरे जावे लागले. असे हे राजकारणातील दोन नातू म्हणजे नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांची औरंगाबाद-पुणे विमानप्रवासात भेट झाली.

या भेटीचे छायाचित्र त्या दोघांनीही चक्क सोशल मीडियावर शेअर केला असून सुजय विखे यांनी त्या छायाचित्राखाली 'सीमांपलीकडील मैत्री' असे अनोखे कॅप्शन देखील लिहले आहे. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दोघांनाही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यात काही जणांना दोघांच्या मैत्रीचे स्वागत केले, तर काहींनी राजकीय अर्थ काढून दोघांवरही टीका केली. कारण हे दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पक्षाच्या काही कार्यक्रमासाठी औरंगाबादला आले होते. त्याचदरम्यान भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे देखील औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यानंतर दोघांनीही एकसोबत विमान प्रवास केला. यादरम्यान त्यांच्यात छान गप्पांची मैफील देखील रंगली.

तसेच सध्याच्या राजकारणावर देखील चर्चा झाली. दोघांनीही जवळपास 40-50 मिनिटे विमान प्रवास केला. यावरून सोशल मीडियावर दोघांच्या मैत्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. काहींनी याचा राजकीय अर्थ काढून दोघांनाही पक्ष बदलणार काय? अशी विचारणा केली. काहींनी या मैत्रीचे कौतूक केले. अनेकांनी दोघांवर देखील कडाडून टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...