आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना काळातही राजकारण:राजकीय पक्षांचा पत्रापत्रीचा खेळ;सर्वसामान्यांवर मात्र रडण्याची वेळ

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जनता ऑक्सिजन, औषधोपचार, लस यासाठी त्रस्त असताना सत्ताधारी-विरोधक आरोप करण्यात दंग

राज्यातील जनता ऑक्सिजन, औषधे, उपचार आणि लस यासाठी तडफडत असताना नेते मात्र पत्रापत्रीचा खेळ करत जनतेची थट्टा करत आहेत. देशातील १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिल्यावर महाराष्ट्रातील विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपनेही हे "पत्रा'स्त्र आपल्या हातात घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांना. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी काही मागण्या केल्या होत्या. राजकीय पक्षांच्या या पत्रापत्रीच्या खेळात सामान्यांच्या जिवाचा मात्र खेळ होताना दिसतो आहे.

पत्र 1 : 15 एप्रिल 2021-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

पत्र 2 : 12 मे 2021- 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

पत्र 3 : 15 मे 2021- देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधी यांना पत्र

पत्र 4 : 15 मे 2021-गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

बातम्या आणखी आहेत...