आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञान:‘ध्रु‌व’च्या चिपनिर्मिती प्रकल्पातील संशोधकांच्या टीममध्ये परतूरचा सुमीत खालापुरे

परतूर (आशिष गारकर)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीपीएसपेक्षा 4 लाख पट अचूक माहितीची क्षमता

नेव्हिगेशन अर्थात एखाद्या स्थानापर्यंत पोहाेचण्यासाठी दिशादर्शकाचे काम करणाऱ्या जीपीएससारख्या तंत्रज्ञानात भारतासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘ध्रुव’ चिपची निर्मिती आयआयटी मुंबई येथील संशोधकांच्या गटाने केली आहे. सध्याच्या जीपीएसपेक्षा ४ लाख पट अचूक व अधिक स्पष्टपणे माहिती देण्याची या चिपची क्षमता असल्याचा दावा केला जात आहे. या संशोधकांच्या टीममध्ये मूळ परतूरचा व सध्या मुंबई आयआयटीत पीएचडी करणाऱ्या सुमीत खालापुरेचा समावेश आहे.

लायन्स क्लबचे झोनल चेअर पर्सन मनोहर खालापुरे यांचा तो मुलगा आहे. सुमीतने प्राथमिक शिक्षण विवेकानंद विद्यालय येथे, तर सहावी ते १२ पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथून पूर्ण केले आहे. नागपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर गोव्यातील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नाॅलॉजी येथून त्याने एमटेकची पदवी संपादन केली आहे. विशेष म्हणजे एमटेकमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला होता. कारगिल युद्धानंतर भारतीय बनावटीचा ‘नाविक’ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. नवी चिप नाविक या उपग्रहाशी जोडली असून भूभागावर कोणतेही ठिकाण आपण अगदी स्पष्ट पाहू शकतो असा दावा या संशोधनात केला आहे.

बातम्या आणखी आहेत...