आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वर्क फ्रॉम होम? छे, छे…. आता ‘वर्क फ्रॉम नेचर’ अनलॉकनंतर पर्यटनविश्वात रुजू पाहतोय निसर्गाच्या सान्निध्याचा नवा ट्रेंड

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महासंसर्गाच्या विळख्यात सारे जग असताना नागरिकांनी लॉकडाऊन काळात वर्क फ्राॅम होमचा पर्याय निवडला. घरी राहून काम करण्याचे फायदे-तोटेही या काळात अनुभवता आले. मात्र, अनलॉकनंतर आता ‘वर्क फ्रॉम होम’ऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करण्याची अर्थात ‘वर्क फ्रॉम नेचर’चा नवा ट्रेंड पर्यटनविश्वात रुजू होऊ पाहतो आहे.

पर्यटक निवास गेल्या नऊ महिन्यांपासून बंद होते. मात्र, अनलॉकनंतर एमटीडीसीच्या सर्वच पर्यटक निवासांच्या ठिकाणी हालचाली सुरू झाल्या. सरकारी, खासगी आस्थापना खुल्या झाल्या. सलग नऊ महिने घरात बसून राहिलेली मंडळी नव्या उत्साहाने बाहेर पडू लागली आणि कुटुंबीयांसह छोट्या सहलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. त्याच्या जोडीने लग्नमुहूर्त सुरू झाले आणि वेडिंग, रिसेप्शन डेस्टिनेशन्सची मागणी सुरू झाली. त्यातून ‘वर्क फ्रॉम नेचर’ची संकल्पना पुढे आली, अशी माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापक (पुणे) दीपक हरणे यांनी दिली.

नेमकी गरज काय ?

सतत घरात बसून कंटाळलेल्या मंडळींना बदल हवा आहे. शिवाय निसर्गरम्य ठिकाण, कुटुंबीयांची सोबत, ठरावीक वेळीच कामाची सक्ती नसणे आणि कामासाठी अनिवार्य अशा वायफाय सुविधांची जोड, ही वर्क फ्रॉम नेचरची संकल्पना आहे. घरातील एका खोलीत, टेबल-खुर्चीवर बसून तासन््तास संगणकावर डोळे जडवण्याऐवजी खुल्या अवकाशात, निसर्गसुंदर ठिकाणी, प्रसन्न वातावरणात काम करण्याचा आनंद ‘वर्क फ्रॉम नेचर’चा गाभा आहे.

ऑल इन वनचा आनंद मिळाला

वर्क फ्रॉम नेचर संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले अारिफ अत्तार म्हणाले की, ‘मी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत बिझनेस एक्स्पान्शन मॅनेजर म्हणून काम करतो. गेले नऊ महिने वर्क फ्रॉम होम सुरू होते. अनलॉक सुरू झाल्यावर एमटीडीसीच्या कोयनानगर येथील रिसॉर्टवर कुटुंबीयांसह एका दिवसाच्या सहलीसाठी आलो आणि इथे उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिल्याने इथला मुक्काम वाढवून वर्क फ्रॉम नेचरचा आनंद घेतला. इथे काम करताना आपण काम करतोय असं वाटतच नव्हतं.

बातम्या आणखी आहेत...