आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाशे लोकसंख्येच्या गावात 14 बळी:आरोग्य यंत्रणेची गावाकडे पाठ, पीपीई किट घालून गावकरीच गाठताहेत घाट

मनोज व्हटकर,मंगेश फल्ले|मढाळ (रत्नागिरी)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्न समारंभाहून परतलेल्या एकाच कुटुंबातील 12 जण बाधित
  • सणवार साजरे केल्याने गावात संक्रमण वाढले

रत्नागिरी जिल्ह्यात शिर्केवाडी, चव्हाणवाडी, बोधवाडी, सोलकरवाडी, नितोरेवाडी, कातकरवाडी अशा सहा वाड्यांचे मिळून बनलेले मढाळ (मढाळपाली) गाव जिल्ह्याच्या एका टोकाला असल्याने आरोग्य यंत्रणा तेथे पोहोचलीच नाही. गावकरीही लग्न, बारसे धूमधडाक्यात करत राहिले. होळी आणि शिमग्याचा उत्सवही उत्साहात साजरा केला. गावकऱ्यांच्या शिमग्यानंतर कोरोनाने मृत्यूची ‘होळी’ सुरू केली. केवळ सहाशे लोकसंख्येच्या गावात त्याने १४ जणांचे बळी घेतले. आरोग्य कर्मचारी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास कचरत असल्याने गावातील युवकच पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करत आहेत.

मढाळ गावात एकही दवाखाना नाही. खासगी डॉक्टरही नाही. मुंबईतील चाकरमान्यांचे हे गाव. जवळपास ६०० लोकसंख्येच्या गावात १३० जण बाधित आढळले. कोरोनाचा काळ असतानाही गावकऱ्यांनी सणवार साजरे करणे थांबवले नाही. शिमग्याला पालखी मिरवणूक काढली. बारसे, लग्न धूमधडाक्यात केले. पण त्यानंतर कोरोनाबाधितांची आणि मृत्यूची साखळी सुरू झाली. गावात विरळ वस्ती असतानाही कोरोनाने मात्र गावाला पूर्णपणे घेरले. काशीराम कदम यांचे कुटुंब कोतळुक या गावातील लग्नाहून परतल्यानंतर या कुटुंबातील १२ जण बाधित आढळले, तर शोभा चंद्रकांत चव्हाण या ग्रामपंचायत सदस्याचा कोरोनाने बळी घेतला. या कुटुंबाने घरी बारशाचा कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर सहा जण बाधित झाले. ज्येष्ठ महिलाही बाधित आढळल्या. गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण लोकांचे जीव वाचवण्यासाठी जागृती करत होते. त्यांची पत्नी मनाली (४५) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांची मुले पोरकी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील या टोकाच्या गावाकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाचेही कमालीचे दुर्लक्ष होत आहे. गावात कोरोना चाचण्या घेण्यासही आरोग्य प्रशासन पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरगुती उपाय करूनच आजारातून बरे होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

पूर्वी १०० रुग्ण, शिमग्यानंतर रोज ६००
या कुटुंबातील १२ जण बाधित आढळले, तर शोभा चंद्रकांत चव्हाण या ग्रामपंचायत सदस्याचा कोरोनाने बळी घेतला. या कुटुंबाने घरी बारशाचा कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर सहा जण बाधित झाले. ज्येष्ठ महिलाही बाधित आढळल्या. गावातील सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण लोकांचे जीव वाचवण्यासाठी जागृती करत होते. त्यांची पत्नी मनाली (४५) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांची मुले पोरकी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील या टोकाच्या गावाकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाचेही कमालीचे दुर्लक्ष होत आहे. गावात कोरोना चाचण्या घेण्यासही आरोग्य प्रशासन पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थ घरगुती उपाय करूनच आजारातून बरे होण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

अनेक कुटुंबे उद्ध्वस्त
बदलापूरहून आलेल्या मुलामुळे चव्हाणवाडीतील कुटुंबीयांना त्रास झाला. एक एप्रिलला राजाराम कदम यांचा मृत्यू झाला. ते बारशाच्या कार्यक्रमाला गेले. त्यांच्या अंत्यविधीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारीही पुढे येत नव्हते. अन्य तिघांवरही गावकऱ्यांनीच अंत्यसंस्कार केले. आरोग्य यंत्रणा कुठेही दिसली नाही. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.

वीस किमीवर आरोग्य केंद्र
रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला गाव असल्यामुळे आरोग्य विभागाची कोणतीच यंत्रणा तिकडे फिरकतही नाही. या गावापासून पाच किमीवरील खासगी दवाखान्यात गावकऱ्यांना जावे लागते. वीस किलोमीटरवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्याचा गावकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. लोक उपचारासाठी तेथे जात नाहीत. अनेकांनी घाबरून गाव सोडले आहे.

दुखणे अंगावर काढणे ठरते जोखमीचे
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या घटली आहे. निवृत्त आरोग्य अधिकारी, डॉ. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, लक्षणे दिसल्यानंतरही लोक आजार अंगावर काढतात. जेव्हा ते उपचारासाठी येतात तेव्हा परिस्थिती आणखी बिघडलेली असते. माझ्याकडे ५८५ टेस्टिंगमध्ये १७३ जण बाधित आढळले.

आधी होते ३० रुग्ण, नंतर झाले १३०
बोधवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिर्के यांनी सांगितले की, गावात सुरुवातीला फक्त ३० रुग्ण होते. शिमगा उत्सवानंतर मार्च व एप्रिलमध्ये एकाच घरात बारा जण, तर चव्हाणवाडीत प्रत्येक घरात एक कोरोनाबाधित आढळून आला. आता यातून धडा घेत लोक घरातच थांबत आहेत. केवळ वीस लोकांमध्ये लग्न होऊ लागले आहे.

जिल्ह्यात २ ते ३ टक्के मृत्युदर आहे. २२० गंभीर रुग्ण, तर ४७८ऑक्सिजनवरील रुग्ण आहेत. मृतांमध्ये ६० वयाच्या पुढील लोकांचे प्रमाण जास्त आहे. अनेक तरुणही बाधित होत आहेत. गावकरी उपचारासाठी लवकर येत नसल्याने ही परिस्थिती आहे. पूर्वी रोज १०० रुग्ण आढळून यायचे. शिमगा उत्सवानंतर दररोज सहाशे ते सातशे रुग्ण आढळून येऊ लागलेत. -एस. के. फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

बातम्या आणखी आहेत...