आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साताऱ्यात पेट्रोल चोरी:पाइपलाइनमध्ये छिद्र करुन चोरले शेकडो लिटर पेट्रोल, पेट्रोलमुळे विहिरीतील पाण्याचा रंग झाला नारंगी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिसरात पेट्रोल पसरल्यामुळे 20 एकर शेतीचे नुकसान

महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. यादरम्यान पेट्रोल चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. साताऱ्यात पेट्रोलच्या पाइपलाइनमध्ये छिद्र करुन पेट्रोल चोरीची घटना समोर आली आहे.

पेट्रोल चोरांनी हिंदुस्तान पेट्रोलियमची मुंबई-पुणे-सोलापुर रोडवरील 223 किलोमीटर लांब पाइपलाइनमध्ये साताऱ्या जिल्ह्यातील सासवड गावाजवळ मोठे छिद्र केले. यातून शेकडो लिटर पेट्रोल चोरुन नेले, पण चोरांना पाइपलाइनचे छिद्र बंद करू शकले नाही आणि यातून हजारो लिटर पेट्रोल परिसरात पसरले.

20 एकर शेतीचे नुकसान

यावेळी पेट्रोल या परिसरातील तीन विहीरीत गेले, तसेच 15 ते 20 एकर शेतीचेही नुकसान झाले. विहीरीत पेट्रोल भरल्याची माहिती गावकऱ्यांना लागताच त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली. यावेळी गावातील शेतकऱ्यांनी म्हटले की, विहीरीत नारंगी रंगाचे पाणी दिसत आहे आणि आमच्या शेतीचेही नुकसान झाले आहे. आता माहिती नाही, यापूढे पिक येईल की नाही.

बातम्या आणखी आहेत...