आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Plan To Work In Two Shifts In The Ministry; Chief Minister Uddhav Thackeray's Instructions To The Administration

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांचे निर्देश:मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये काम करता यावे, यासाठी नियोजन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे'

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याबाबत नियोजन करा आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे. महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबतचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. याशिवाय, मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले. याबाबत त्यांनी एक दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य तपासणी

यावेळी, मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...