आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेंटिलेटरच ‘अाॅक्सिजन’वर:‘पीएम केअर’चे महाराष्ट्रात 4427 व्हेंटिलेटर्स, तांत्रिक दाेषामुळे 875 पडूनच

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
पीएम केअर फंडातून मिळालेले, पण नादुरुस्त व्हेंटिलेटर - Divya Marathi
पीएम केअर फंडातून मिळालेले, पण नादुरुस्त व्हेंटिलेटर
 • दिव्य मराठी फॅक्ट चेक : अनेक ठिकाणी कंपनीचा प्रतिसाद नाही

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट

पीएम केअर फंडातून कोविड रुग्णालयांना देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स पूर्ण क्षमतेने कार्यरत हाेऊ शकले नसल्याने केंद्र विरुद्ध राज्य सरकार, भाजप विरुद्ध अन्य पक्ष अशा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. हे व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकारने केले आहेत तर ते पडून राहिल्याने खराब झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. राजकारणाच्या पलीकडे या व्हेंटिलेटर्सची नेमकी स्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील नेमकी परिस्थिती जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव पुढे अाले. काही ठिकाणी पार्ट‌्स‌ नसल्यामुळे व्हेंटिलेटर्स सुरू झाले नसल्याचे दिसले, तर काही ठिकाणी संबंधित कंपन्यांनी दुरुस्ती न केल्याने व्हेंटिलेटर्स पडून अाहेत.

‘पीएम केअर’ व्हेंटिलेटर्सचे दुखणे

 • कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाने फुप्फुसे निकामी झाल्यावर अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्समार्फत कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो.
 • हा पीएसआर (प्रेशर सपोर्ट व्हेंटिलेटर) ४५ ते ७५ असावा असा कोविड उपचारांचा प्रोटोकॉल आहे.
 • मात्र, या व्हेंटिलेटर्सचे सेटिंग ४५ पीएसआरवरून २१ वर ड्रॉप होते.
 • त्यामुळे हे व्हेंटिलेटर्स ऑक्सिजनऐवजी फक्त हवा पंप करू लागतात.
 • परिणामी, अतिगंभीर रुग्णांसाठी ते वापरता येत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

-रुग्णांच्या जिवाशी खेळू नका, नादुरुस्त व्हेंटिलेटर्स साभार परत करणार. - सुभाष देसाई, उद्योगमंत्री

-पडून राहिल्याने बिघडले, राजकारण करू नका. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते व्हेंटिलेटर्स तकलादू, फडणवीसांनी सुरू करून द्यावेत. - सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

​​​​​​​अकाेला

 • आलेले व्हेंटिलेटर्स : ७०
 • यापैकी चालू : ३०
 • नादुरुस्त : ४०
 • कारण : इन्स्टॉलेशनसाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही.

पुणे

 • आलेले व्हेंटिलेटर्स : १४७
 • यापैकी चालू : ७२
 • नादुरुस्त : ७५
 • कारण : बंद पडतात, पार्ट‌्स मिळत नाहीत, दुरुस्तीसाठी कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही.

उस्मानाबाद

 • आलेले व्हेंटिलेटर्स : १५
 • यापैकी चालू : सर्व
 • नादुरुस्त : ०
 • कारण : अाॅक्सिजन ड्राॅप हाेताे, अितगंभीर रुग्णांसाठी वापरता येत नाही.

नाशिक

 • आलेले : ९५
 • चालू : ३१ {नादुरुस्त : ६४
 • कारण : कनेक्टर व स्टँड मिळत नसल्याने पडून अाहेत. कंपनीतर्फे इन्स्टॉलेशनला नकार.पाठपुरावा करूनही कंपनीचा प्रतिसाद नाही.

बीड

 • आलेले : १९३
 • यापैकी चालू : ९४
 • नादुरुस्त : ९९
 • कारण : तांत्रिक बिघाड, दुरुस्ती करण्याचे प्रयत्न.

जळगाव

 • अालेले : ८४
 • यापैकी चालू : ७७
 • नादुरुस्त : ७
 • कारण : अाधी बंद हाेते, कंटेनर लावल्यावर सुरू झाले.

हिंगोली

 • आलेले : ९७
 • यापैकी चालू : ८५
 • नादुरुस्त : १२
 • कारण : साॅफ्टवेअर प्राॅब्लेम, सेटिंग बदलते.

औरंगाबाद

 • आलेले व्हेंटिलेटर्स : १००
 • चालू : ३९ नादुरुस्त : २७
 • कारण : अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवठा करीत नाहीत. कंपनीच्या तंंत्रज्ञांंचा प्रतिसाद नाही, ३७ इन्स्टॉलेशनशिवाय पडून.

चौकशी अहवालाचे निष्कर्ष
१२ एप्रिल रोजी अाैरंगाबादला पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले १०० व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याची चाैकशी राज्य सचिवांच्या अादेशानुसार अाैरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केली. त्यांनी सादर केलेेला अहवाल -

या व्हेंटिलेटर्समधून कोविड रुग्णांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने हे व्हेंटिलेटर्स डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलमधील अतिगंभीर रुग्णांना वापरता येण्याजाेगे नाहीत. कंपनीच्या इंजिनिअर्सना याची कल्पना देण्यात आली असता ते मदत न करता निघून गेले. २३ एप्रिल रोजी ते पुन्हा आले, परंतु फक्त दाेन व्हेटिलेटर्स दुरुस्त करून निघून गेले. ते व्हेंटिलेटर्स अतिदक्षता विभागात पाठवले असता पुन्हा नादुरुस्त झाले. या अडचणीमुळे उरलेले ३७ व्हेंटिलेटर्स इन्स्टाॅल न करता पडून आहेत.

अन्य राज्यांतही हीच बाेंब
बाबा फरीध विद्यापीठाला पीएम केअर फंडातून ११३ व्हेंटिलेटर्स अाले हाेते. त्यापैकी २३ वापरात अाहेत, तर ९० चालू स्थितीत अचानक बंद पडत अाहेत. - डाॅ. राज बहादूर, कुलपती, बाबा फरीध विद्यापीठ पंजाब

अामच्या रुग्णालयाला ५० व्हेंटिलेटर्स मिळाले हाेते. मात्र, त्यांना नाेझलच नसल्याने ते चालवता अाले नाही. कंपनीचे तंत्रज्ञ अाले पण त्यांनाही सुरू करता अाले नाही. - डाॅ. एच. एस. रेखी, राजिंदरा रुग्णालय, पतियाळा

बातम्या आणखी आहेत...