आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाहीर पुरंदरेंना शुभेच्छा:100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींकडून बाबासाहेब पुरंदरेंना मराठीतून शुभेच्छा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित लावली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना मराठीतून दिल्या आहेत. दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मी सुरुवातीलाच साष्टांग नमस्कार करतो. शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे. त्याचे आचरण करण्याची शक्ती मला मिळावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वर्षांत पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा. त्यांचे मार्गदर्शन, त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळाले. पुढेही त्यांचे आशिर्वाद मिळत राहावे ही मंगलकामना. अशा मराठीतून शुभेच्छा मोदींनी दिल्या.

तुम्ही शिवाजी महाराजांचा जो आदर्श समोर ठेवला. तो आम्हाला प्रेरणा देत राहील. मी बाबासाहेबांच्या उत्तम आरोग्याची शुभकामना करतो, असेही मोदी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...