आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त समस्त महाराष्ट्रीयनांना चक्क मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याला महान संस्कृती आणि मेहनती लोक लाभल्याचे कौतुक त्यांनी केले.
आज 63वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. तसेच राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
काय म्हणाले मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चक्क मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी शुभेच्छांचे ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील, अशी मी कामना करतो.
गुजराती बांधवांनाही...
महाराष्ट्रासोबत आज गुजरात राज्याचाही स्थापना दिन आहे. याबद्दल मोदी यांनी गुजरातीमधून ट्विट करत गुजरातच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, गुजरात स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….! गुजरात राज्याने आपल्या सर्वांगीण विकासाबरोबरच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात राज्याने विकासाची नवी उंची गाठावी, अशी मी प्रार्थना करतो.
हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण
महाराष्ट्र दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यानंतर हुतात्मा चौक येथे उपस्थित राहून महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केले. तर नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. तसेच राज्यभर ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
ठिकठिकाणी कार्यक्रम
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 या दिवशी झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची फलनिष्पत्ती म्हणून आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कुशल, सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मराठी भाषिकांचे, संस्कृती-परंपरेचे हे राज्य नवी स्वप्ने, नवी ध्येय घेऊन अवतरले. महाराष्ट्र देशाची अविरत विकासाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त आज ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संबंधित वृत्तः
महाराष्ट्र आधार हा भारताचा..!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.