आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत तालुक्यातील वाई फाटा शिवारामध्ये डमी ग्राहक बनलेल्या कुरूंदा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एकास बुधवारी सायंकाळी पाच वाजता देशी कट्यासह पकडले. त्याच्याकडून दोन काडतुसही जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती मागील काही दिवसांपासून वसमत येथे फळांचा व्यवसाय करत होता. यावेळी तो देशी कट्टा देखील मागणी नुसार आणून देत असल्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीश देशमुख, उपाधीक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरूंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या पथकाने त्याच्यावर लक्ष ठेवणे सुरू केले होते. तो उत्तरप्रदेशातून देशी कट्टा आणून देत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सोबत डमी ग्राहक बनून संवाद साधला. त्यानुसार आज कट्टा व दोन काडतूस आणून देण्याचे ठरले होते. त्यावरून पोलिसांनी वाई फाटा शिवारात सापळा रचला.
दरम्यान, सायंकाळी पाच वाजता सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. टी. वाळके, तुकाराम आमले, रामदास ग्यादलवाड, पटवे, ढेंबरे, करवंदे साळुंके, विनायक जानकर यांच्या पथकाने वाई फाटा येथे सापळा रचला.
यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने डमीग्राहकासोबत संवाद सुरू केला. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. यावेळी तो गोंधळून गेला पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केले. त्याने त्याचे नाव रमाशंकर ओमप्रकाश कशब (२८, रा. उत्तर प्रदेश) याशिवाय पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी वाहन ( क्र.युपी- २७ के-३२३४ ) जप्त केले आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच पोलिसांनी त्याची अधिक चौकशी सुरू केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.