आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Police Transfer Fraud Case Updates; The Report Must Have Been Prepared By Jitendra Awhad And Nawab Malik Devendra Fadnavis

फोन टॅपिंग प्रकरण:'तो' अहवाल जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी तयार केला असावा- देवेंद्र फडणवीस

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फक्त त्यावर सही केली असावी

सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच तापले आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दिक हल्ले करताना दिसत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. 'फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सोपवण्यात आलेला अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल', असा दावा त्यांनी केला आहे.

शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला आणि भाजपवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, 'मी सीताराम कुंटेंना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. हा अहवाल जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिका यांनी तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

'त्या अहवालात अनेक त्रुटी आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न असेल तेव्हाच फोन टॅप करता येतात, असे अहवालात म्हटले आहे. पण कायद्यानुसार एखादा गुन्हा होण्याचा संशय असेल तर फोन टॅपिंगची परवानगी असते. नेमकी हीच ओळ अहवालातून वगळण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडूनही याच कलमाखाली फोन टॅप केले जातात. त्यामुळे फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारचा संपूर्ण अहवालच सदोष आहे', असेही फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...