आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोलिसांचा सन्मान:केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांचा सन्मान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

74 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलिस पदकांची घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यापैकी 5 पोलिस अधिकाऱ्यांना सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. तर 14 पोलिसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 पोलिस पदके जाहीर झाली.

केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलिस पदके जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलिस पदक जाहीर झाली आहेत. यातील 80 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक तर 215 पोलिसांना शौर्य पदके आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झाली आहेत.

0