आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:1.29 लाख बालकांना पोलिओ डोस दिला जाणार, बाहेर जिल्हयातून आलेल्या कामगारांच्या पाल्यांना लसीकरण करण्याची सुचना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात पुढील काळात शुन्य ते 5 वर्ष वयोगटातील 1.29 लाख लाभार्थ्यांना पोलिओ डोस दिला जाणार असून त्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांना तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कामगारांच्या पाल्यांचे लसीकरण करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी गुरुवारी दिल्या आहेत.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत 23 जानेवारी रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरणाबाबत बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, डॉ देवेंद्र जायभाये, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांच्यासह वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी दैने यांनी लसीकरणाच्या बाबतीत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करूनच त्यांची नियुक्ती करावी. जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानक, बसस्थानके व सार्वजनीक ठिकाणी लसीकरण केंद्र ठेवण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून त्यांच्या घरी जाऊन पालकांना लसीकरणाची माहिती द्यावी. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये याची दक्षता घेण्याच्या सुचनाही दैने यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी पापळकर यांनीही मार्गदर्शन केले. लसीकरणासाठी मनुष्यबळासोबतच आवश्यक साधन सामुग्रीची उपलब्धता ठेवावी. 23 जानेवारी रोजी लसीकरण असले तर पुढील दोन ते तीन दिवस लसीकरण सुरु ठेवण्याच्या सुचना पापळकर यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...