आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौकशीची मागणी:'पूजा माझ्या मतदारसंघातील तरूणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे'; पंकजा मुंडे आक्रमक

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोडांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ

पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर भाजपने शिवसेनेच्या एका मंत्र्याचा यात हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकरण अजूनच तापले. या प्रकरणावरुन बीडच्या माजी माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चकशीची मागणी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, 'पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे.'

संजय राठोडांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- चित्रा वाघ
या प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी संजय राठोड यांच्याव सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री शिवसेना नेते संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,' असे चित्रा वाघ म्हणाल्या.