आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मालकाने मारहाण केल्याने हमालाने केली आत्महत्या; डीएनए चाचणीने पटली ओळख

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव इजारा येथील हमालाने पाच महिन्यांपूर्वी पुस नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात मृताच्या आईने ३० ऑक्टोबरला तक्रार दाखल करत मालकाच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी १२ मार्च रोजी डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी १५ मार्च रोजी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह कुजला होता. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागली.

विठ्ठल गणपत पवार (३५ ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गजानन रामराव कनवाळे (३८, रा. वाघनाथ, ता. महागाग) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विठ्ठल हा कनवाळेच्या दुकानावर हमाल म्हणून कामाला होता. एक दिवस चूक केली म्हणून कनवाळेने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याने रात्री नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी डीएनएचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाच महिन्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...