आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:'मी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केल्यामुळे मला पक्ष सोडायला लावला, आता एकनाथ खडसेंवरही तीच वेळ आणली'-प्रकाश शेंडगे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावरुन माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 'मी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती, म्हणून मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. आता एकनाथ खडसेंवरही तीच वेळ आणली, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले की, 'मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले. मुंडेंसोबत ओबीसी समाजाचे अनेक नेते होते, एकनाथ खडसेसुद्धा त्यापैकीच एक आहेत. गोपीनाथ मुंडेंचा जेव्हा अपघात झाला, तेव्हा त्यांच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मी केली होती. माझ्या या मागणीमुळेच मला पक्ष सोडावा लागला. माझे तिकीटही कापण्यात आले. आता तीच वेळ एकनाथ खडसेंवर आली आहे,' असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...