आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोस्तव:विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे, शिवसेनेला किंमत मोजावी लागेल - प्रवीण दरेकर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'विनायक राऊत यांचे विधान दुटप्पीपणाचे असून, त्यांना कोकणातील जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागेल', अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर केली आहे. 'मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवासाठी कोकणात यावे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. यावरुन दरेकर यांनी प्रतिक्रीया दिली.

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, 'कोकणातील जनता असो वा मुंबईतला चाकरमानी, कोणतीही तकलादू भूमिका घेणार नाही. मुंबईतील चाकरमानी सुरक्षितरित्या आपल्या गावी गेला पाहिजे. तो गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची तपासणी असेल. त्यांना क्वारांटाईन करावे लागेल. पण त्याचा चाकरमान्यांना त्रास होणार नाही, अशी दुहेरी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे, ' असे दरेकर म्हणाले.

'विनायक राऊतांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. एका बाजूला भावना आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती आहे. या कोकणच्या जनतेच्या भावनेवर शिवसेना स्वार झाली. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढविली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला ते आता पायदळी तुडवत आहेत. या वस्तुस्थितीची जाणीव विनायक राऊत करुन देत आहेत, हे फार दुर्दैवी आहे. यामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल,' अशी टीका दरेकर यांनी केली.