आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Prime Minister Narendra Modi Lauds Farmers Of Surya Producer Company Of Satephal, Advises To Inspire Farmers In The State

हिंगोली:सातेफळच्या सुर्या प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकऱ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतूक, ई-नाम बाबत राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा दिला सल्ला

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने केली २.७५ कोटींची उलाढाल

वसमत तालुक्यातील सातेफळ येथील सुर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे शेतकरी प्रल्हाद बोरकर यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ता. १ संवाद साधला. यावेळी त्यांनी ई-नाम योजनेमुळे शेतकऱ्यांना होत असलेला फायदा याची माहिती घेऊन बोरगड यांचे कौतूक केले. तसेच या योजनेबाबत शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

देशात ई नाम संदर्भात शेतकऱ्यांना होत असलेला फायदा तसेच या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार झारखंड, पंजाब, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार होता. मात्र हिंगोली जिल्हयातील सातेफळ येथील सुर्या फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे कामकाज पाहून या कंपनीचे संचालक व शेतकरी प्रल्हाद बोरकर यांच्याशी चर्चा करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

त्यानुसार आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी बोरगड यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोरगड यांनी ई नाम योजनेमुळे शेतकऱ्यांना होत असलेला फायदा याची माहिती दिली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतीमालास चांगला दर मिळाल्याचेही बोरगड यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोविडच्या काळातही शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण गेली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोरगड यांनी सर्व प्रक्रिया व शेतकऱ्यांना झालेला फायदा व ई नाम योजनेच्या माध्यमातून कंपनीने केलेली उलाढाल ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतूक केले. तर ई नाम बाबत इतर शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा सल्लाही त्यांनी बोरकड यांना दिला आहे.

सुर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने केली २.७५ कोटींची उलाढाल

या कंपनीने मागील एक वर्षात तब्बल २.७५ कोटी रुपयांची शेतीमाल विक्रीतून उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांनी सुर्या कंपनीकडे शेतीमाल दिल्यानंतर त्यावर क्रमांक टाकून शेतीमाल विक्रीसाठी मोंढ्यात ठेवला जातो. त्यानंतर खरेदीदारांनी शेतीमालाचे दर ठरविल्यानंतर त्याची माहिती शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठविली जाते. त्यानंतर अर्धातासाचा वेळ शेतकऱ्यांना दिला जात असून त्यांच्या संम्मतीनेच शेतीमाल विक्री होत असल्याचे बोरगड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...