आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नमो' मंदिर:पुण्यात मोदी भक्ताने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उभारले मंदिर, अनेक जणांची नमो मंदिरात फोटो काढण्यासाठी गर्दी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात चक्क मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींची मूर्ती उभारली आहे. पुण्याच्या औंध येथे पंतप्रधान मोदी यांना देवाचा दर्जा देत त्यांचे छोटे मंदिर तयार केले आहे. यामध्ये पंतप्रधानांची 2 फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे.

नमो फाउंडेशनच्या वतीने हे मंदिर तयार करण्यात आले आहे. 15 ऑगस्टला 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांचे हे मंदिर सध्या पुण्यात चर्चेचा चांगलाच विषय बनला आहे. पुण्यातील भाजपचे कार्यकर्ते असलेल्या मयूर मुंढे यांनी मोदींचे हे मंदिर बांधले आहे. सध्या मोदींची ही मूर्ती पाहण्यासाठी नमो भक्तांची गर्दी होत आहे.

मयूर मुंढे यांनी पंतप्रधानांवर तयार केलेली कविता देखील आकर्षणाचा विषय ठरते आहे. विरोधकांनी ट्रोल केले तरी चालेल पण मला मोदींकडून प्रेरण मिळते, असे म्हणत मयूर यांनी मोदींवर केलेल्या कविता मंदिराच्या बाहेर लावण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहेय याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...