आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पबजीचे व्यसन:16 वर्षीय मुलाने पबजीच्या नादात आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये लंपास केले, पालकांनी फटकारल्यानंतर सोडलं घर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅन झाल्यानंतर भारतात पुन्हा लॉन्च झालेल्या अ‍ॅक्शन गेम 'पबजी' च्या संदर्भात मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या खेळाच्या वेडामध्ये एका 16 वर्षीय मुलाने आपल्या कुटुंबाचे 10 लाख रुपये उडवले आहे. जेव्हा पालकांना या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मुलाला चांगलेच फटकारले. यामुळे संतापलेल्या मुलाने घरातून पळ काढला. मात्र, मुंबई पोलिसांनी काही मुलाला काही वेळातच शोधून काढले.

मुंबई पोलिस डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, अंधेरीमध्ये एक 16 वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. तपासात समोर आले की, मुलाला PUBG खेळण्याचे व्यसन होते. त्याने गेम ID आणि UC खरेदी करण्यासाठी त्याच्या पालकांच्या खात्यातून वेळोवेळी 10 लाख रुपये काढले होते. आई -वडिलांवर नाराज होऊन मुलगा बुधवारी घर सोडून गेला होता आणि यामुळे आमच्या टीमने त्याला काही तासांच्या प्रयत्नानंतर अंधेरी (पूर्व) च्या महाकाली लेणी परिसरातून बाहेर काढले आहे.

बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता -
नलावडे म्हणाले की, मुलगा बेपत्ता झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तरुणाने स्वतःच्या मर्जीने घर सोडले होते, म्हणून आता हे प्रकरण बंद करून मुलाला समजावून घरी पाठवले आहे. आम्ही पालकांना मुलाचे समुपदेशन करण्याची विनंती केली आहे.

आईच्या खात्यातून 10 लाख रुपये काढण्यात काढले -
तपासादरम्यान, मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की त्याला गेल्या महिन्यापासून PUBG चे व्यसन लागले आहे आणि त्याने मोबाईल फोनवर खेळत असताना त्याच्या आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च केले. जेव्हा त्याला यासाठी फटकारले गेले तेव्हा तो घरातून पळून गेला.

बातम्या आणखी आहेत...