आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune Aurangabad Nagpur Flights | Marathi News | Pune Aurangabad Nagpur Flights From March 1; Decision In The Meeting Of The Airport Authority

विमानसेवा सुरू:पुणे-औरंगाबाद-नागपूर 1 मार्चपासून विमानसेवा; विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-औरंगाबाद-नागपूर अशी नवी विमानसेवा १ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे, तर पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू करण्यात येणार असून अमरावती विमानतळावरून नोव्हेंबर २०२२ पासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सोमवारी मुंबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडवणे व विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या विविध सूचनांबाबत सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल व राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल, अशी माहिती दीपक कपूर यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांचा समावेश होता.

बैठकीतील महत्त्वपूर्ण घोषणा

  • कोल्हापूर, रत्नागिरीस लागणारा निधी महाराष्ट्र सरकारकडून मंजूर केला जाणार.
  • शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार.
  • नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करणार.
  • १८ फेब्रुवारीपासून पुणे-शिर्डी-नागपूर अलायन्स एअरची विमानसेवा
  • १ मार्चपासून पुणे-औरंगाबाद-नागपूर इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होणार.
बातम्या आणखी आहेत...