आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune Gang Rape Case: Frequent Gang Rape Of A Young Girl By Making A Pornographic Video In Pimpri Chichvad; News And Live Updates

पिंपरीत सामूहिक अत्याचार:अश्लील व्हिडिओ बनवून तरुणीवर वारंवार केला सामूहिक बलात्कार, 2 अल्पवयीनांसह एकूण 4 जणांना अटक

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संबंधित प्रकरणात पीडित तरुणीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

पिंपरी चिंचवड शहरात एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चौघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित प्रकरणात पीडित तरुणीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरोधात कलम 342, 376 (1), 376 (ड), 377, 323, 504, 506, 120 (ब), आयटी ॲक्ट 67, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 3 (1) (12) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज जाविद खान ,मुस्ताक सलीम सय्यद, सोहेल शेरअली पिरजादे ,रियाज जावेद खान तसेच दोन अल्पवयीन मुलांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीडित युवती आणि आरोपीची गेल्या वर्षभरापासून एकमेकांची मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचा फायदा घेत आरोपी मागील पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास आरोपी भाग पाडत होते. कधी जनावरांच्या गोठ्यात तर कधी देहूरोड शहरातील स्मशानभूमी जवळ असलेल्या निर्जनस्थळी नेऊन तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

संबंधित आरोपींच्या त्रासाला कंटाळून तरुणीने ही बाब आपल्या नातेवाइकांना सांगितली. त्यानुसार पीडित तरुणीच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाई करून आरोपींना गजाआड केले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीवर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...