आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे जिल्ह्यात सध्या H3N2 विषाणू मुलांसाठी धोकादायक बनला आहे. पाच वर्षांखालील मुले याच्या विळख्यात येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये आयसीयू तुडुंब भरले आहेत. बाधित बहुतेक मुलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाधित मुलांवर अँटीबायोटिक देखील काम करत नाहीत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2013 पासून पुण्यात एकूण 2,529 नमुने तपासण्यात आले. यापैकी 428 (सुमारे 17 टक्के) H3N2 विषाणू पॉझिटिव्ह आढळले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर घेतलेल्या नमुन्यांमध्ये या विषाणूने ग्रस्त मुलांची संख्या सर्वाधिक आहे. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञ डॉ. वर्षा पोतदार यांनी सांगितले की, हे नमुने गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARI) ची लक्षणे असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांचे आहेत.
श्वास घेण्यात अडचण
पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये गेल्या 4-6 आठवड्यांपासून आयसीयू तुडुंब भरले आहेत. भारती हॉस्पिटलमधील बालरोग ICU च्या प्रभारी डॉ. भक्ती सारंगी म्हणाल्या की, ‘आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली बहुतांश मुले ही लहान आणि शाळकरी मुले आहेत. त्यापैकी काहींना यकृत आणि रक्तदाबाशी संबंधित समस्याही होत्या. अशा परिस्थितीत त्यांना व्हेंटिलेटरच्या आधाराची गरज आहे. त्यापैकी बहुतेक पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. बहुतेक मुलांनी श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि तापाची तक्रार केली. न्यूमोनिया सारखी लक्षणे देखील आहेत.’
H3N2 संसर्गाव्यतिरिक्त, एडिनोव्हायरसमुळे देखील मुलांना आयसीयूमध्ये दाखल केले जात आहे.
आरोग्य विभागानेही दुजोरा दिला
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे इंटेन्सिव्हिस्ट डॉ. भरत पुरंदरे म्हणाले की, केवळ H3N2च नाही तर कोविड-19 आणि H1N1 संसर्गाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, H3N2 मुळे मोठ्या संख्येने मुले दाखल होत आहेत, जो इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे.
ICMR च्या अहवालानुसार, गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम (SARI) ग्रस्त दाखल झालेल्या रुग्णांपैकी 92% रुग्णांना ताप, 86% खोकला, 27% श्वास लागणे, 16% अस्वस्थता आहे. अहवालात म्हटले आहे की, 16 टक्के रुग्णांना न्यूमोनिया, 6 टक्के रुग्णांना फेफरे येण्याच्या तक्रारी होत्या. 10% SARI रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर 7 टक्के रुग्णांची आयसीयूमध्ये काळजी घ्यावी लागते.
सह्याद्री हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून आमच्या हॉस्पिटलमध्ये दररोज 3-4 रुग्ण दाखल होत आहेत. यापैकी बहुतेकांना H3N2 ची लागण झाली आहे.
या संबंधित आणखी बातम्या वाचा...
H3N2 महामारीमुळे 10 लाख मृत्यू:इन्फ्लूएंझा व्हायरसची संपूर्ण कथा, जो आता भारतात वेगाने पसरतोय
भारतात जानेवारी ते मार्च हा काळ फ्लूचा हंगाम मानला जातो. यादरम्यान लोकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसतात. हा फ्लू हंगाम खूप वेगळा आहे. आता तर रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, पण त्यांचा खोकलाही आठवडाभर बरा होत नाहीये. आयसीयूमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण दाखल करावे लागत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरचा असा विश्वास आहे की, याचे कारण H3N2 विषाणू असू शकते, जो भारतात वेगाने पसरत आहे. मंडे मेगा स्टोरीमध्ये आपण इन्फ्लूएंझा A चे उपप्रकार H3N2 विषाणूची संपूर्ण कथा जाणून घ्या... वाचा पूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.