आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेकरांना दिलासा:पुण्यात कोरोनामुळे लॉकडाउन नाही, आज रात्रीपासून 31 मार्च पर्यंत केवळ कडक निर्बंधांची घोषणा; उपमुख्यमंत्री म्हणाले- गांभीर्याने घ्या

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाला गांभीर्याने घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पुण्यात लॉकडाउनच्या चर्चा सुरू असतानाच विभागीय आयुक्तांनी लॉकडाउन लागणार नाही असे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. त्यामध्ये सरसकट लॉकडाउन न लावता केवळ कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अजित पवार म्हणाले- गांभीर्याने घ्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, यात विरोधी पक्षासह दोन खासदार सुद्धा होते. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात आला. माझी तमाम महाराष्ट्र आणि पुण्याच्या जनतेला आवाहन आहे, की कोरोना आणि त्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांना गांभीर्याने घ्या. लसिकरणाला प्रतिसाद द्या. लोक नियमांचे पालन करत नसल्याने आपल्याला कडक निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतची संचारबंदी अत्यावश्यक सेवा सोडून आपण लागू केली आहे.

पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार, आजपासून 31 मार्च पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांसह सार्वजनिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर अंत्यविधी आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमता येणार नाही. 31 मार्च पर्यंत हॉटेल आणि मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु, या दरम्यान त्यांना 50 टक्केच आसनक्षमता ठेवावी लागणार आहे. रात्री 10 ते 11 या दरम्यान हॉटेल सुरू राहतील पण, त्यांना ग्राहकांना बसवता येणार नाही. या काळात ते केवळ होम डिलिव्हरी करू शकतील. उद्याने सुद्धा केवळ सकाळी सुरू आणि संध्याकाळी बंद ठेवले जातील.

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून गुरुवारी पुण्यातील विद्यार्थी रस्तायवर उतरले होते.
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून गुरुवारी पुण्यातील विद्यार्थी रस्तायवर उतरले होते.

एमपीएससीच्या परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहेत. अशात राज्यभरातील अनेक विद्यार्थी पुण्यात आलेले असतात. त्यामुळे, एमपीएससी आणि यूपीएससी करिता असलेले क्लास आणि लायब्रेरी सुरू राहतील. परंतु, त्या ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त क्षमतेने कुणालाही बोलावता येणार नाही. पुण्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाईल आणि निर्बंध मोडणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...