आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नमो' मंदिर:पुण्यातील पंतप्रधान मोदींचे मंदिर रातोरात हटवले; देव चोरीला गेला म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन, दरवाढ कमी करण्यासाठी आता आम्ही कुणाला साकडे घालायचे? राष्ट्रवादीचा सवाल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील औंध भागात पंतप्रधान मोदिंचे मंदिर बांधण्यात आले होते. या मंदिरात पंतप्रधानांचा पुतळाही बसवण्यात आला होता. मयुर मुंढे या भाजप कार्यकर्त्याने हे मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे रातोरात हे मंदिर हटवण्यात आले आहे. तसेच मोदींचा पुतळाही हलवण्यात आला आहे.

दरम्यान, रात्रीपासून पंतप्रधान मोदींची मूर्ती गायब झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने देवच चोरीला गेल्याने आंदोलन केल्या जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाल्यावर आम्ही कोणाला साकडे घालायचे ? आमच्या नवसाला कोण पावणार? असा सवाल उपस्थित करत पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आता तरी देव आम्हाला पावणार का? महागाई कमी करणार का? असे म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन केले.

पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूर मधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला होता.

बातम्या आणखी आहेत...