आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमेदवारी जाहीर:पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली नावे निश्चित

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रकांत पाटील - देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो)
  • औरंगाबादेतून पंकजा मुंडे समर्थकाला तिकीट, पंकजांची नाराजी दूर करण्याचा पक्षाचा प्रयत्न

भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या चार उमेदवारांची घोषणा केली आहे. शिरीष बोराळकर, संग्राम देशमुख, संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना भाजपने तिकीट दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान महापौर संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना तिकिट देण्यात आले आहे. महाविकास आघाडीतर्फे कोणत्या उमेदवारांचा सामना भाजपला करावा लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

पंकजांची नाराजी दूर करण्याचा पक्षाचा प्रयत्न

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचे समर्थक शिरीष बोराळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असल्याने समर्थकाला तिकीट देऊन त्यांची नाराजी काहीशी दूर करण्याचे पक्षातून प्रयत्न होताना दिसत आहेत.

तर नागपुरात गडकरी समर्थक अनिल सोले यांचे तिकीट कापून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे फडणीसांचे पारडे जड होणार आहे. संदीप जोशी यांनी याआधीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.