आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीकास्त्र:'दुधसंघातून मलिदा खाण्याचे काम सरकारमधील मंत्री करत आहेत, मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात'- राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'राज्यातील सरकारने शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे, त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाहीत', असा घणाघात भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते आज अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

यादरम्यान विखे पाटील म्हणाले की, 'दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका आहे. आपल्या दुधसंघातून मलिदा खाण्याचे काम सरकारमधील मंत्री करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात असल्यामुळे ते दबावाखाली काम करत आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची सरकारने फसवणूक केली आहे', असा आरोप विखे पाटलांनी केला.

कोरोना रुग्णाच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला

यावेळी विखे पाटलांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, 'राज्यातील कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारवर टीका करत आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे, ही दुर्दैवी बाब आहे, असं विखे पाटील म्हणाले.

0