आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निकालानुसार आधी, अधिकृत पक्ष कोणता आणि पक्षप्रमुख कोण हे ठरवावे लागणार आहे, त्यानंतरच प्रतोताची नियुक्ती आणि आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघेल, असे मत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमंशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती किंवा मान्यता ही रद्द ठरवली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे मत व्यक्त केला आहे. नार्वेकर म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टाने गोगावले यांची नियुक्ती करताना केवळ विधिमंडळ पक्षाच्या प्रमुखांनी त्यांची नियुक्ती केली, या एका कारणामुळे नियुक्तीला मान्य देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तर सुप्रीम कोर्टाने अधिकृत शिवसेना पक्ष आणि तत्कालीन पक्षप्रमुख याचा निर्णय आधी घ्यावा, असे मत व्यक्त केले.’
निर्णयाचा अधिकार अध्यक्षांनाच
राहुल नार्वेकर सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय राहुल नार्वेकर यांनाच घ्यावा लागणार आहे.
या संबंधित आणखी बातम्या वाचा...
राज्यपाल चुकले, अध्यक्ष चुकले मग जबाबदारी का नाही? खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह?
राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार आहे. मात्र असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षातील प्रक्रियेत राज्यपाल विधानसभा अध्यक्षांचे निर्णय चुकल्यावरुन त्यांना फटकारले आहे. असे असतानाही सोळा आमदारांच्या पात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडेच सोपवण्यात आला आहे, यावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पदाचा गैरवापर झाला असेल तर त्याची जबाबदारी निश्चित का केली नाही? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा...
शिंदे - फडणवीस सरकार हे बेकायदेशीरपणे सत्तेत आले; कोर्टाने ओढलेले ताशेरे हेच सांगतात - पृथ्वीराज चव्हाण
शिंदे - फडणवीस सरकार हे बेकायदेशीरपणे सत्तेत आले आहे. कोर्टाने ओढलेले ताशेरे हे सरकार घटनाबाह्य आहे हेच सांगत आहेत, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचे सरकार हे वापस आणता येणार नाही. हे कोर्टाने स्पष्ट केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे बहुमत नाही, असे मान्य केले म्हणून दुसरा मुख्यमंत्री निवडला जाणे योग्य आहे. मात्र, हे सरकार बेकायदेशीर, असंवैधानिक आहे. पूर्ण बातमी वाचा..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.