आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कारवाई:साताऱ्यामध्ये व्यापाऱ्याच्या घरावर छापा; 103 किलो जिलेटिन जप्त

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • खोदकामासाठी ब्लास्टिंगचा परवाना असला तरी जिलेटिनचा साठा करण्याची परवानगी नाही

सातारा जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास पाटण तालुक्यातील तारळ्यातील राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल १०३ किलोच्या जिलेटिनच्या स्फोटकांचा साठा जप्त केला. विहिरीच्या खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनच्या कांड्यांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदसिंह राजपूत (४५, सध्या रा. तारळे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

राजपूत हा सहा वर्षांपासून तारळ्यात राहतो. तो मूळचा राजस्थानचा आहे. विहीर खोदकामासाठी ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे विहीर खोदण्याचा परवानाही आहे. त्याने भागात अनेक विहिरींच्या खोदकामासाठी ब्लास्टिंगही केले आहे.

ब्लास्टिंगचा परवाना असला तरी जिलेटिनचा साठा करण्याची परवानगी नाही, तरीही त्याने साठा केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विशेष शाखेच्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप पाटील आणि त्यांच्या पथकाने तारळ्यात थेट छापा टाकून कारवाई केली. गोविंद सिंह याच्या घरामागील न वापरल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहात चार बॉक्समध्ये हा साठा आढळला.

तसेच पांढऱ्या रंगाच्या बोलेरो या वाहनात पिशवीमध्ये २९ जिलेटिनच्या कांड्या व दुसऱ्या निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये २७ डिटोनेटर्स वायरसह आढळून आले. एकूण ९ हजार ४५३ रुपये किमतीच्या एकूण ८३६ जिलेटिनच्या कांड्या (स्फोटक पदार्थ-वजन अंदाजे १०३ किलो), ३ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी असा एकूण ३ लाख ९ हजार ४५३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...