आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा जोर वाढणार:राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पंधरवड्यापासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र आता पुन्हा परतीच्या पावसाने जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगावसह इतर काही जिल्ह्यांना देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि बीड या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. तर तिकडे अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर भागात देखील पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात काल परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तसेच, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, संग्रामपूर, मोताळा, लोणार आणि मेहकर तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...