आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा फेरीवाल्यांना इशारा:लवकर बऱ्या व्हा, बाकीचं आम्ही बघून घेतो, फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी कल्पिता पिंपळेंना राज ठाकरेंचा दिलासा

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाणे महापालिकेच्या अनधिकृत फेऱ्यावाल्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना आयुक्तांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली. लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो, अशा शब्दात राज ठाकरे यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठकारे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे व्हा, हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतो आहे. अशा प्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतं आहे, असही राज ठाकरे बोलले.

काय आहे नेमकं प्रकरण?
घोडबंदर भागातील कासारवडवली येथे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु असताना माजिवाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अंगरक्षकावरही हल्ला केल्याने त्याच्याही हाताचे एक बोट तुटले आहे. या दोघांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर भाजी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...