आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Raj Thackrey । Mumbai Pune MNS Branch President's Meet Canceled For Some Time; The Date Of The Next Meeting Will Be Announced Soon, He Tweeted

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीत बिघाड:मुंबई-पुण्यातील मनसे शाखाअध्यक्ष मेळावे कार्यक्रम काही काळ रद्द; लवकरच पुढील मेळाव्याची तारीख जाहीर करणार, ट्विट करत दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. अशी अधिकृत माहिती मनसेच्या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने शाखाध्यक्षांच्या मेळाव्याचा कार्यक्रम देखील काही काळ रद्द करण्यात आले आहे.

मनसेचा आज मुंबईमधील भांडूप तर उद्या पुण्यात शाखाध्यक्षांच्या मेळाव्याचे कार्यक्रम होणार होते. तेथे आपल्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे संबोधित करणार होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना मेळाव्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता राज ठाकरे यांची प्रकृतीबाबत माहिती मिळाल्याने हे मेळावे काही काळ पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मनेसेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून असे ट्विट करण्यात आले आहे की, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार दि.२३/१०/२०२१ रोजी मुंबईत, तर दि.२४/१०/२०२१ रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.' असे ट्विट करत कार्यकर्त्यांना मेळावे आज रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...