आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनावर कोणत औषध सध्या निघाले नाही. ही वस्तुस्थिती देशाला माहित आहे. परंतु, हे कोरोनिल हे औषध कोरोनावर म्हणुन आम्ही महाराष्ट्रात विकु देणार नाही. ते प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध असून तसे त्यावर लिहावयास असायला पाहिजे अन्यथा त्यावर कारवाई करु असा सुचनावजा ईशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अप्रत्यक्षरित्या पतंजलीला दिला.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज 5 जुलै रोजी बोलत होते. यावेळी पतंजलीच्या कोरोनिलऔषध हे कोरोनाचे औषध नसल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, चार दिवसआधी मुंबई येथे गेलो असता त्या औषधाचे घटक तेव्हा मी विभागाकाकडुन तपासनु बघितले. त्यामध्ये आयुष मंत्रायलयाने जे प्रिस्क्राईप केलेले होते, त्यानुसार तुळस, अश्वगंधा ,गुळवेल असे तीन चार घटक आहेत. या घटकांची त्यांनी गोळी तयार केली आहे. या गोळीचा उपयोग फक्त प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहे. त्यातुन कोरोना बरा होत नाही.
कोरोनिल म्हणजे कोरोना निल असा शब्द होतो. तो ग्राहकांची दिशाभुल करणारा आहे. आम्ही स्पष्ट सुचना अन्न व औषध प्रशासनाचे वतीने दिल्या आहेत. या औषधाचा उपयोग रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी करावा. यामुळे कोरोना बरा होतो असे जाहिरातीत आली तर अशा जाहिरातीचा जो कायदा आहे. त्याचा अंमल करुन कायदयानुसार कारवाई करु. असे डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.