आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प'वॉर':माध्यमांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करू नये; शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून हा विषय संपवतील- राजेश टोपे

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना जाहीररीत्या अपरिपक्व म्हणत फटकारल्यानंतर सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रीया दिली. जालन्यात माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, 'पवार कुटुंब आदर्श कुटुंब आहे. शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्रित बसून हा विषय एका मिनिटात संपवतील,' असे टोपे म्हणाले.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, 'शरद पवारांच्या घरी एकोपा असतो. माध्यमांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करू नये. शरद पवारां घर आदर्श घर आहे. शरद पवार ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकाराने काही बोलले असतील तर तो त्यांच्या घरातील मुद्दा आहे. माझ्या दोन पीढ्यांचा पवार कुटुंबाशी संबंध आहे. शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून एका मिनिटात हा विषय संपवतील. यात काहीही अडचण नाही,' असे राजेश टोपे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...