आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते-अजित पवार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाने एक अभ्यासून नेता गमावला

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...