आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना फोन:जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन, राणे म्हणाले- माझी तब्येत बरी नसल्याची त्यांनी फक्त हवा केली

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनआशीर्वाद यात्रा ही संपूर्ण देशातच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधत असताना त्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. यावेळी राजनाथ सिंह यांनी नारायण राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. राणे हे मोबाइलद्वारे संवाद साधताना कॅमेरात कैद झाले आहे.

राजनाथ सिंह यांचा नारायण राणेंना फोन...
माझी तब्येत आता चांगली आहे, मी रुग्णालयात दाखल नव्हतो. मी रुग्णालयात गेलोच नाही. जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. मी यात्रेतच आहेत. माझी तब्येत बरी नसल्याची त्यांनी हवा केली, असे राणेंनी मोबाइलवरुन राजनाथ सिंह यांना सांगितले. तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल नारायण राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...