आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:'नट-नट्या अपमान करत असतील तर शेतकऱ्यांची पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील- राजू शेट्टी

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतच केंद्र सरकारने कृषी विधेयकल मंजुर केले आहे. या विधेयकावरुन प्रचंड गोंधळ सुरू आहे. यातच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीगी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच, 'कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही,'' असे म्हणत अभिनेत्री कंगना रनोटवरही टीकास्त्र सोडले.

यादरम्यान राजू शेट्टी म्हणाले की, 'उत्तर प्रदेश, कर्नाटक,पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा या ठिकाणी शेतकरी त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणे हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनोटसारख्या नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही.'

'हिमाचल प्रदेशातील एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने शेतकऱ्यांबद्दल बोलणे यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडी म्हणावे की काय म्हणावे यासाठी मला शब्द सुचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असले तरी याच शेतकऱ्यांचे पोरं हातात दगडं घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत,' असेही शेट्टी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...