आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाची दखल:राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी होते आंदोलन

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत कृष्णा नदीत उड्या मारल्या. मात्र प्रशासनाने आंदोलनाचा इशारा लक्षात पूर्ण तयारी केली होती. म्हणून त्यांना सर्वांना सुखरुप बाहेर काढले आहे.

पाच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली. दुपारनंतर यात्रा कुरूंदवाड येथून वाडी च्या दिशेने निघाली आहे. कुरुंदवाडच्या पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनाची प्रशासनाकडून दखल
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. रात्रीपासूनच जिल्हा प्रशासन राजू शेट्टींशी संवाद साधत आहे. संवादाची दारे नेहमीच उघडी आहेत. मला हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही. पंचगंगा परिक्रमेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रशासन हादरले, असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...