आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलन:'...पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही'; राजू शेट्टींचा बारामतीत एल्गार

बारामती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजू शेट्टींचे दूधदर वाढीसाठी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला. राजू शेट्टींच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला. 'गाढविनीचे दूध 1 हजार रुपयांना विकले जाते, पण गाईच्या दुधाला किंमत नाही', असे टीकास्त्र यावेळी राजू शेट्टींनी केले.

यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्यासोबत जनावरे आणली होती. कडेकोट पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की,'आमच्यावर आंदोलन करायची वेळ का आली, याचा विचार करा. गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर, शेणही विकले जाते. पण आमच्या दुधाला किंमत नाही. गाढविनीचे दूध 1 हजार रुपये लिटर किंमतीने विकले जाते, पण सत्तेवरच्या गाढवांना गाईच्या दुधाची किंमत कळत नाही,' असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, 'यंदा दूध उत्पादन कमी झाले आहे, जनावरांच्या संख्येतही फरक पडला. लॉकडाऊनमुळे दूध उत्पादनाला फटका बसला. लॉकडाऊन जाहीर करणाऱ्यांनी जरा याचा विचार केला पाहिजे. दूध रस्त्यावर ओतले तर आमच्याकडे देशद्रोही म्हणून बघता. शेतकऱ्याने रागाच्या भरात दुध रस्त्यावर ओतलयावर तुम्हाला राग येतो. पण दुधाची किंमत तुम्हाला करता येत नाही', असे राजू शेट्टी म्हणाले.

'सत्ताधाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. सहा कोटी लिटर दुधाची खरेदी केली. त्यात दीडशे कोटी रुपये लुटले. मात्र भाववाढ झाली नाही. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आधी सांगितलं मिळेल मात्र अजून मिळाले नाहीत. या लोकांनी आधी दीडशे कोटींवर दरोडा टाकला, आता परत दोन महिने दरोडा टाकायची परवानगी दिली. तुम्ही आम्ही मावस भाऊ आणि सगळे मिळून वाटून खाऊ. अशी राज्यात परिस्थिती आहे. काही दूध संघ फक्त कागदावरचे, आणि सरकारला 17 ते 18 रुपयांनी विकले आहे, त्यात मंत्र्यांचा सहभाग आहे', अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.