आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी पौर्णिमा:खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रक्षाबंधन, सुप्रिया सुळेंनी शेअर केले फेसबूक लाइव्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. सुप्रिया सुळेंनी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी अजित पवारांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन रक्षाबंधनाचे लाइव्ह शेअर केले आहे. सुप्रिया सुळेंचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वांनाच माहित आहे. पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र जमून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन, भाऊबीज यांसारखे सण साजरे करतात.

यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवरुन राखी पौर्णमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अजित पवार यांनी ट्विटरवरुन सर्व कोरोना वॉरिअर्सच्या लढ्याला सलाम केला. ते म्हणाले की, 'कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे,' अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...