आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातही सेलिब्रेशन:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी उभारली गुढी, तर राऊतांनी ट्विट करत दिल्या 'स्वप्नपूर्ती'च्या शुभेच्छा, गडकरींनी घरीच केली पूजा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांपासूनचा राम जन्मभूमीचा संघर्षाचा शेवट आज होत आहे. पंतप्रधान नेरंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत आज राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. 12.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान पंतप्रधान अयोध्येत दाखल झाले आहेत. संपूर्ण अयोध्या नगरजी नवरी प्रमाणे नटली आहे. अयोध्येत उत्सव साजरा केला जात आहे. यासोबतच महाराष्ट्रातही हा आनंदोत्सव साजरा केला जातोय.

अयोध्येत राम मंदिर शिलान्यास सोहळा साजरा हाेत असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या घरी सहकुटुंब पूजा करून रामरक्षा पठण केले. त्यांनी घरुनचं या सोहळ्याचा आनंद घेतला आणि सोहळा अनुभवला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी गुढी उभारुन राम मंदिर भूमीपूजनाचा आनंद साजरा करण्यात आला आहे.

संजय राऊतांचे ट्विट
भूमिपूजनाआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंदिराच्या घुमटावर 'श्रीराम – बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती' असे लिहिलेला फोटो राऊत यांनी शेअर केला आहे. या फोटो खाली 'गर्व से कहो हम हिंदू है' असेही लिहिले आहे.

ऐतिहासिक सुवर्णक्षण जय श्रीराम! - सामना अग्रलेख
‘‘बाबरी पडली, ती पाडणाऱ्य़ा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे!’’ या एकाच गर्जनेने बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट म्हणून कोट्यवधी हिंदूंच्या दिलाचे राजे बनले. आज ते स्थान अढळ आहे. त्या सगळय़ांच्या त्यागातून, संघर्षातून, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहात आहे. पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील. त्या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसरणारे रामद्रोहीच ठरतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपला. राममंदिराच्या भूमिपूजनाने या प्रश्नाचे राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल! सारा देश आज एकसुरात गर्जत आहे,असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

नागपुरातही जोरदार उत्साह

तर नागपुरातही जोरदार उत्साह दिसतोय. येथे बडकस चौक महाल येथे आनंदोत्सव साजरा केला जातोय. रस्त्यांची सजावर केली गेली आहे. तसेच रांगोळ्याही काढण्यात आल्या आहेत. तसेच आमदार गिरीश व्यास, आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला

बडकस चौक महाल येथील आनंदोत्सव
बडकस चौक महाल येथील आनंदोत्सव

देवेंद्र फडणवीसांचेही ट्विट
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अयोध्येतील पवित्र मातीला शत शत प्रणाम केला आहे.

बातम्या आणखी आहेत...