आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना शिवसेना वाद:'कंगनाच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, पण अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणे योग्य नाही'-रामदास आठवले

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कंगनाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण, महिला म्हणून कंगनाला संरक्षण देणे आमची नैतिक जबाबदारी आहे', असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी आठवले म्हणाले की, 'कंगनाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण, ती एक महिला आहे आणि तिच्याबद्दल अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. महिला म्हणून तिला संरक्षण देणे आमची नैतिक जबाबदारी आहे. तिने रागाच्या भरात मुख्यमंत्र्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख केला असेल. पण, असा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही. शिवसेना आणि अनेक पक्षांची कार्यालये अवैध आहेत. त्यांना तुम्ही तोडणार आहात का? अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...