आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिवाळ्यात प्रवास करण्याची मज्जा वेगळीच असते. सध्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीत काश्मीरच्या मध्यभागी असलेले श्रीनगर ही फारच लोकप्रिय जागा आहे. श्रीनगरमधील नगीन आणि दाल ही दोन्ही सरोवर जगप्रसिद्ध आहे. या निसर्गरम्य ठिकाणाची भुरळ आता केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही पडली आहे.
रावसाहेब दानवे यांनी आपल्या ट्विटरवरुन बर्फात गुडूप झालेल्या श्रीनगर रेल्वे स्टेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. बनिहालपासून बडगामपर्यंतचा काश्मीर खोऱ्याचा भाग बर्फाच्या चादरीत लपेटल्यासारखा दिसत आहे. या बर्फातून रेल्वे जात असल्याचा एक व्हिडिओ रावसाहेब दानवे यांनी ट्विट केला आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.
बर्फाची मखमली चादर
श्रीनगर हे हाऊसबोट आणि तलाव यासाठी प्रसिद्घ असलेले शहर आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी अनेक प्रसिद्घ ऐतिहासिक मंदिर आहे. यासोबतच नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि तलावात विहार करणाऱ्या सुंदर हाऊस बोट याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून या ठिकाणी लोकं येतात. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.
रुळ बर्फाच्या चादरीत
रस्ते, बागबगिचे, उद्यानं डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. बर्फाळ चादर पसरल्याने इथला परिसर खूप सुंदर दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये रेल्वे रुळ बर्फाच्या चादरीत गुडूप झाले आहेत. रेल्वे रुळावरुन सुर्योदही अत्यंत सुंदर दिसत आहे. दानवेंनी या फोटोंमध्ये रेल्वे मंत्रालयाला टॅग केले आहे. युजर्सकडून या फोटोंचे कौतुक होताना दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.