आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:अल्पवयीन मुलीवर तिघा जणांचा अत्याचार; विष घेऊन आत्महत्या, परभणी जिल्ह्यात सोनपेठ येथे घडली घटना

सोनपेठ/ परभणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील एका १६ वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मामाच्या तक्रारीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पैकी दोघे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. दोन वर्षांपूर्वी छेड काढणाऱ्या तरुणाने इतर दोन साथीदारांसोबत १२ सप्टेंबर रोजी तरुणीवर अत्याचार केला. १४ सप्टेंबरला तिने विष घेतले. उपचारादरम्यान १८ सप्टेंबरला पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार भावाला सांगितला. या प्रकरणी सोनपेठ पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी आरोपींविरोधात १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला.

लातूरमध्ये घेतला अखेरचा श्वास : अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेला मोठा धक्का बसला होता. तक्रारीनुसार, १४ सप्टेंबरला तिने विष घेतले. उलट्या करताना याचा उलगडा झाला. त्यानंतर नातेवाइकांनी तिला अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून तिला गंभीर स्थितीत लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० रोजी रात्री उशिरा पीडितेची प्रकृती बिघडत गेली व तिने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती लातूरच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सोनपेठ पोलिस ठाण्यातूनही पीडितेचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजाेरा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...