आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरचा मच्छीमार कोट्यधीश:जाळ्यात गावले दुर्मिळ घोळ मासे, 157 माशांची 1.33 कोटींत विक्री; बाजारात एका माशाची किंमत ८५ हजार रुपये

पालघर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाळ्यात घोळ मासळी अडकताच मच्छीमार सोमनाथ तरे यांनी असा जल्लोष केला. - Divya Marathi
जाळ्यात घोळ मासळी अडकताच मच्छीमार सोमनाथ तरे यांनी असा जल्लोष केला.
  • किनाऱ्यापासून 20 ते 25 नॉटिकल मैलांवर सापडली घोळ मासळी

पालघरचे मच्छीमार चंद्रकांत तरे रात्रीतूनच कोट्यधीश बनले आहे. ७ सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी चंद्रकांत यांचे पुत्र सोमनाथ यांनी जाळे फेकताच ‘सी गोल्ड’ म्हटली जाणारी दुर्मिळ घोळ मासोळी त्यात अडकली. एक-दोन नव्हे तर तब्बल १५७ घोळ मासे एकाच वेळी जाळ्यात गावले. पालघर बाजारातील लिलावात या माशांची १.३३ कोटी रुपयांत विक्री झाली.

सोमनाथ म्हणाले, आपण प्रत्येक माशाची सुमारे ८५ हजार रुपयांना विक्री केली. यूपी व बिहारच्या व्यापाऱ्यांनी मासे खरेदी केले. घोळ माशाचे वैज्ञानिक नाव ‘प्राेटाेनिबिअा डायकँथस’ असे आहेे. त्याचा वापर औषधे आणि कॉस्मेटिक्स निर्मितीत केला जातो. थायलंड, इंडोनेशिया, जपान आदी देशांत त्याला खूप मागणी असते. सर्जरीत वापरले जाणारे आणि आपोआप विरघळणारे धागे याच माशापासून तयार करतात. यापूर्वी गुजरातच्या मासेमारांना ११ हजार घोळ मासोळ्या सापडल्या होत्या.

किनाऱ्यापासून २० ते २५ नॉटिकल मैलांवर सापडली घोळ मासळी
सोमनाथ म्हणाले, समुद्रात २० ते २५ नॉटिकल मैल आता वाधवानच्या दिशेने गेलो होतो. बाबांनी फेेकलेल्या जाळ्यात १५७ घोळ मासे अडकले. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई ठरली. समुद्रात प्रदूषण वाढल्याने हे मासे आता किनाऱ्याजवळ सापडत नाहीत.


बातम्या आणखी आहेत...