आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते संजय राउत भाजपा नेत्यांवर आक्रमक झाले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी अपशब्द वापरल्याचे दिसते आहे. तोच व्हिडिओ पुन्हा ट्विट करुन राउत यांनी शायरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
संजय राउत ट्विट करत म्हणाले -
दुनिया में चु**की कमी नही
एक धूंडो तो हजार मिलेंगे...
जरा योगिजी को सूनीये..
दरम्यान, दुसऱ्या ट्विटमध्ये संजय राउत म्हणाले- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 'चु** शब्दाचा सर्वात चांगला वापर योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
खुर्ची देण्यावरून टीका; खवळलेले संजय राऊत म्हणाले...
दरम्यान, संजय राउत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. संसदेत शरद पवारांना खुर्ची देतानाचा संजय राऊत यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. यावरून विरोधकांनी राऊत यांच्यावर टीका केली. या टीकेवरून संजय राऊत विरोधकांवर संतापले.
कुठेही राजकारण करू नका. शरद पवार हे पितृतुल्य आहेत. आणि त्या जागी लालकृष्ण अडवाणी किंवा इतर कुठलेही ज्येष्ठ नेते असते तरीही आपण खुर्ची आणून दिली असती. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ज्यांना ही गोष्ट आवडली नसेल ती त्यांची विकृती आहे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.
गांधी कुटुंबीयांच्या भेटींवरुन भाजपा नेते करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, “मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत… त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असे सांगेन, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.