आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून बॅनरबाजी:'असली आ रहा है, नकली से सावधान' अयोध्येत शिवसेनेकडून बॅनरबाजी करत राज ठाकरेंवर निशाणा

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. अध्योध्येत शिवसेनेने बॅनर लावून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'असली आ रहा है, नकली से सावधान!' अशा आशयाचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला आहे. 10 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्दावरुन धारेवर धरताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत आपण 5 जूनला अध्योध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, तत्पूर्वी शिवसेनेने बॅनरबाजी केली असून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेने अयोध्येतील नया घाट या परिसरात बॅनर लावले आहे. त्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे दिसत आहे. सोबत प्रभू श्रीराम यांचा देखील फोटो बॅनरवर असून, त्यावर 'असली आ रहा है नकली से सावधान! जय श्री राम' असे लिहण्यात आले आहे.

राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि मनसे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली असून, पक्षाकडून त्यासाठी तयारी सुरू आहे. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधीच शिवसेनेकडून बॅनरबाजी करुन राज ठाकरे यांना डिवचण्याचे पाहायला मिळत आहे. मनसेकडून देखील शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. "राज ठाकरेंचे हिंदुत्व हे सोन्यासारखे खरे" असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. कोण असली कोण नकली हे अवघा देश पाहत आहे, असे म्हणत किल्लेदार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...